Home Cities भडगाव अलका सरदार यांची आदिवासी कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधीपदी निवड

अलका सरदार यांची आदिवासी कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधीपदी निवड

0
120

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलका सरदार यांची नुकत्याच झालेल्या जिल्हा आदिवासी कर्मचारी सोसायटीत महिला प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली.

जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटी मर्यादीत या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन -२०२२-२०२७ साठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहकार पँनल कडून चाळीसगाव तालुक्यातील वलठाण शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षिका श्रीमती अलका वामन सरदार या महिला राखीव मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. यावेळी सहकार पँनल चे नेतृत्व अशोक माळी सरांनी केले.

श्रीमती अलका सरदार मँडम यांचे अनेक सामाजिक कामात पुढे राहतात . त्यांनी काही काळ सार्वे ता.पाचोरा येथे सेवा दिली आहे. जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विविध कर्मचारी वर्गाला नेहमी मदत व सहकार्य करत असतात त्यामुळे एवढे भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याने विविध पुरस्कार मिळाले आहेत. या निवडीने अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी व शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण ता.चाळीसगाव सर्व कर्मचारी वर्गाकडून श्रीमती अलका सरदार यांचा सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound