बुलढाणा प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या संकटात अखंड देश गेल्या अकरा महिन्यांपासून हादरलेला आहे. या संकटात प्रत्येक पत्रकार हा स्वत:हा ग्राऊंडवर जाऊन बातमीचे अपडेट घेत असतो. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील साम टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव यांनी घेतला कोरोना लसचा पहिला डोज
संजय जाधव यांनी जिल्हात ग्रामिण भागासह शहरातील प्रत्येक जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता प्रत्येक बातमी लाईव्ह अपडेट केली आहे. याच अनुषंगाने आज संजय जाधव यांनी कोविशिलड लसचा पहिला डोज घेतला आहे. त्यामुळे यांच्या हिम्मतीला दाद द्यावी लागेल. व जिल्ह्यातील पत्रकार स्वतः कोरोना लसीबाबत पुढाकार घेत कृतीतून एक उदाहरण ठेवत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.