जिल्ह्यात आज १ हजार ८९० जणांनी घेतली कोवीडची पहिली लस

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील २२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आज दिवसभरात १ हजार ८९० जणांना पहिली लस तर ४५३ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण २९ हजार ५९० जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज ६१० बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आल्याने आता चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील २२ शासकीय कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज शनिवार ६ मार्च रोजी दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय- २१५, छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल- २१६, गोल्ड सीटी हॉस्पिटल-०, गाजरे हॉस्पिटल-०, ऑर्किड हॉस्पिटल-०, जैन हॉस्पिटल-०, जामनेर-६९, चोपडा-६१, मुक्ताईनगर-७१, चाळीसगाव-९६, पारोळा-१३०, भुसावळ-२६९, अमळनेर-१०१, पाचोरा-७३, रावेर-७२, यावल-१११, भडगाव-४०, बोदवड-८१, एरंडोल-९१, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-११, धरणगाव-८९, एम.डी. भुसावळ-९४ असे एकुण १ हजार ८९० जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज ४५३ जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content