यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बु॥ येथे तापी, पूर्णा वृत्तपत्र संघटनेच्या वतीने आयोजित ‘वृत्तपत्र विक्रेत्यांचा मेळावा’ आज उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन माहिती देत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या व अडी-अडचणींवर प्रकाश टाकला.
या मेळाव्यात मालेगाव येथील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे संघटक सचिव रवींद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना जळगाव उपाध्यक्ष गोपाळ चौधरी, तापी पूर्णा वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष संजय निंबाळकर व तापी पूर्णा वृत्तपत्र संघटनेचे यावल तालुका सदस्य खुशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. वृत्तपत्र विक्रेता यांच्या अडचणी व समस्या बाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली व ‘संघटनेचे पुढील ध्येय या विषयावर सुद्धा मंथन करण्यात आले या मेळाव्याचे आयोजन यावल तालुका तापी वृत्तपत्र संघटना यांनी केले
या मेळाव्यात संघटनेचे सचिव गणेश पाटील, महेश वाणी ,नितीन बानाईत, पांडुरंग बारी, तुषार साळुंके अजय गडे, संजय पाटील, चिनावल येथील विजय सैतवाल, भुसावळ येथील श्रीकांत कुलकर्णी, वाघोदा येथील कमलाकर माळी, जामनेरचे सुनिल सोनी, जीवन चौधरी, उज्वल मराठे, विकास पाटील, अतुल जैन, धनराज पाटील, किरण कुलकर्णी, जानेश्वर विचवे, प्रमोद पाटील, डिगंबर धनगर, विनोद सौतवाल, सुभाष कुलकर्णी जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, यावल तालुक्यातील असंख्य वृत्तपत्र विक्रेते बांधव या मेळाव्यास उपस्थित होते.