Home Cities अमळनेर देवगाव येथे ई-पीक पाहणी व ई-केवासीबाबत कार्यशाळा

देवगाव येथे ई-पीक पाहणी व ई-केवासीबाबत कार्यशाळा

0
68


अमळनेर-गजानन पाटील । विद्यार्थ्यांना ई-पीक पाहणी, ई-केवासी यासह मतदार कार्ड व आधार कार्ड लिंक जोडण्यासंदर्भात नगाव मंडळाच्या वतीने तालुक्यातील देवगाव येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगाव मंडळाच्या वतीने अमळनेर तालुक्यातील देवगाव येथील महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना ई-पीक पाहणी, ई-केवासी यासह मतदार कार्ड व आधार कार्ड लिंक जोडण्यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी नगावचे मंडळ अधिकारी पी.एस.पाटील, देवगावचे तलाठी प्रथमेश पिंगळे, हेडावेचे तलाठी धीरज देशमुख, पिंगळवाडे येथील तलाठी एस.ए. कुळकर्णी, देवगाचे कोतवाल गोकुळे बैसाने, ग्रामसेवक निकुंभ यांच्यासह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound