मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अर्थ व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अमरावती कार्यालयाचे सहसंचालक पद पहिल्यांदाच एका महिलेकडे आले आहे. संध्या मिलींद गवई या पदावर रुजू झाल्या आहेत. यापूर्वी या पदावर पुरुष अधिकारीच नियुक्त करण्यात आले आहेत. महिला म्हणून पहिल्यांदाच त्यांना ही संधी मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हे पद रिक्त होते. त्यामुळे उपसंचालकच या पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळीत होत्या. मध्यवर्ती बसस्थानकानजिकच्या जवादे बिल्डींगमध्ये राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सहसंचालकांचे कार्यालय आहे. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यालयालयाच्या माध्यमातून गोळा होणारी मनुष्यबळ, पशुधन, यंत्रसामग्री, शेती, शेतीपिके आदींची माहिती एकत्र करुन त्याचा दस्तऐवज तयार करणे, हे या कार्यालयाचे प्रमुख कार्य आहे.