फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथे नुकतेच बदलून आलेले मुख्याधिकारी वैभव लोंढे हे रजेवर गेल्यामुळे भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे येथील मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची सावदा येथे बदली झाली होती. तर त्यांच्या जागी वैभव लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली होती. श्री. लोंढे हे ३० दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. यामुळे आता त्यांच्या पदाचा कार्यभार हा भुसावळ येथील मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संदीप चिद्रवार यांची फैजपूरच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी नियुक्ती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे. पुढील महिनाभर ते फैजपूर नगरपालिकेची सूत्रे सांभाळणार आहेत.