यावल पंचायत समितीतील दोन अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती

यावल, प्रतिनिधी । येथील पंचायत समितीमध्ये आपली प्रशासकीय सेवा कार्यपुर्ण करणारे सहाय्यक प्रशासक अधिकारी जी .व्ही जोशी व तालुका वैद्यकीय कुष्ठरोग अधिकारी एन .सी . बोंडे यांचा आज सेवानिवृत्तीचा निरोप मिळाला आहे.

यावल पंचायत समितीच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता पार पडलेल्या सेवापुर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमन्त बऱ्हाटे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . मनिषा महाजन , पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासक अधिकारी जी .एम .शिंदे , सहाय्यक विस्तार अधिकारी के सी सपकाळे यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती . या सेवापुर्ती कार्यक्रमात यावल पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासक म्हणुन कार्यरत असलेले जी .व्ही . जोशी आणी तालुका कुष्ठरोग वैद्यकीय अधिकारी एन सी बोंडे यांचा सहपरिवार सेवापुर्तीपर सत्कार करण्यात येवुन निरोप देण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी अधिकारी डी पी कोते यांनी केले . याप्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांनी आपल्या प्रशासकीय सेवे बद्दल चे कार्य अनुभव आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .

Protected Content