भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तहसील कार्यालय परिसरातून जप्त केलेले वाळूचे डंपर चोरून नेल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैधपणे वाळू वाहतूक करणारे डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ५३०१) हे तहसील कार्यालयातील महसूल पथकाने जप्त करून भुसावळ तहसील कार्यालयात पार्कींगला लावलेले होते. दरम्यान, तहसील कार्यालयाच्या आवारात पार्कींगला लावलेले वाळूचे डंपर हे अबु मिर्झा रा. मेहरूण जळगाव आणि समाधान पाथरवट रा. साकेगाव या दोघांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी २० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आले. त्यानंतर मंडळाधिकारी रजनी तायडे यांनी याबाबत भुसावळ शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अबु मिर्झा रा. मेहरूण जळगाव आणि समाधान पाथरवट रा. साकेगाव या दोघांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सैय्यद हे करीत आहे.