जळगाव प्रतिनिधी । भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर चोरणाऱ्या संशयित आरोपी रूपिकेश रतिलाल माळी रा. पिंपरखेड ता. भडगाव याचा अटकपुर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
अधिक माहिती अशी की, भडगाव शहरात २० जानेवारी २०२१ रोजी संशयित आरोपी रूपीकेश रतिलाल माळी आणि विधी संघर्ष बालक वाळू वाहतूक करत असतांना आढळून आले होते. भडगाव तहसील कार्यालयातील मंडळाधिकारी रमेश तायडे यांनी ही कारवाई करून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीझेड ५७५) जप्त केले होते. ही कारवाई केल्यानंतर तहसील कार्यालयात ट्रॅक्टर जमा करण्यात आले होते. दरम्यान ट्रॅक्टर चालक रतिलाल माळी आणि विधीसंघर्ष बालकाने मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त केलेले ट्रॅक्टर चोरून पळवून नेले. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात दोन्ही आरोपी फरार झाले होते. आज न्यायालया दोघांचा अटकपुर्व जामिन जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. आर.जे.कटारियांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी केला.