‘संवेदना फाउंडेशन’तर्फे निबंध स्पर्धा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील संवेदना फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने मुक्ताईनगर मतदारसंघाची राजकीय वाटचाल काल, आज आणि उद्या या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालय ,संत मुक्ताबाई महाविद्यालय ,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुर्‍हा काकोडा, सरदार वल्लभाई पटेल महाविद्यालय ऐनपुर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड या एकूण सहा महाविद्यालयातील ४१४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. संबंधीत स्पर्धेचे आयोजन संवेदना फाउंडेशन च्या अध्यक्ष अ‍ॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या प्रेरणेतुन करण्यात आले. समन्वयक म्हणून खडसे महाविद्यालयाचे प्रा डॉ. दीपक बावस्कर तर सहसमन्वयक म्हणून प्रा.डॉ.कृष्णा गायकवाड यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आ. एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला जाणार आहे.

Protected Content