शिरसमणी येथे विविध कामांचे भूमिपूजन

shirasmani udghatan

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसमणी येथे तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन,उदघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.

याच्या अंतर्गत शिरसमणी तांडा येथील नविन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन,युवकांसाठी व्यायामशाळेचे भूमिपूजन, जि. प. शाळा तांडा येथील वर्गखोलीचे उदघाटन, जि. प. शाळेस संरक्षक भिंत तसेच गावातील कॉक्रीट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पांडूरंग पाटील,शेतकरी सहकारी संघाचे संचालक चेतन पाटील, अनंतकुमार पाटील,उपसरपंच दशरथ नाईक, भटुशेठ शिंपी,सदस्य सुरेश पाटील,सदस्य प्रकाश पाटील, गोकुळ पाटील, नवल पाटील, बळीराम पाटील,छोटूआप्पा पाटील, आण्णा पाटील, राजू पवार,गोरख पाटील,शामशेठ शिंपी,आजाबराव गोपाळ,नाना गोपाळ,साहेबराव पाटील,प्रविण पाटील,भीमराव राठोड जोतीराम राठोड,धनराज राठोड,रवि राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content