मुक्ताईनगरात कामगारांना सुरक्षा किट चे वाटप

safety kit distribution

मुक्ताईनगर प्रतिनिधी । अटल विश्‍वकर्मा सन्मान योजने अंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बांधकाम कामगारांना विविध २८ योजनांचा लाभ घेण्यासाठी आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या नोंदणी शिबिरामध्ये ३००० हुन अधिक कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यातील सुमारे शंभर कामगारांना खासदार रक्षाताई खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे -खेवलकर यांच्या हस्ते सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, जि. प. सदस्य निलेश पाटील, प स सदस्य किशोर गायकवाड, प्रदीप साळुंखे, जिवन राणे,स्वीय सहायक योगेश कोलते, राजु भाऊ माळी,सुनिल काटे, मुन्ना बोडे, आर पी पाटील, सुजित पाटील, प्रा पी. पी. लढे, प्रा. अतुल बढे, व्ही. पी. महाजन, प्रा. प्रतिभा ढाके, पांडुरंग नाफडे, संतोष खोरखडे, डॉ मनिषा महाजन, डॉ वेदांत चव्हाण, कल्पेश महाजन, संतोष सोनवणे, डॉ. अभिजित ठाकूर उपस्थित होते

यावेळी सौ रोहिणी खडसे म्हणाल्या की, सबका साथ सबका विकास या ध्येयाप्रमाणे अंत्योदयाचा विकास व्हावा यासाठी विविध योजना राबवित आहे. आ एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व कामगार बंधू यांनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. खासदार रक्षाताई खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे समाजातील वंचित दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे

अटल विश्‍वकर्मा योजने मध्ये नोंदणी झालेल्या कामगारांना कामावर काही अपघात होऊ नये यासाठी सुरक्षा किट देण्यात येत आहे व उर्वरित साहित्य खरेदी करण्यासाठी बँक खात्यात५००० रु जमा करण्यात येणार आहेत. कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला ५लाख रुपये विम्याची मदत नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मदत पाल्याच्या शिक्षणाला पाहिले ते उच्च शिक्षणासाठी मदत , घर बांधकाम साठी मदत ,वैद्यकीय उपचार साठी मदत अशा विविध२८ योजनांचा लाभ होणार आहे. सूत्रसंचालन संतोष खोरखडे तर आभार प्रदर्शन सतिश चौधरी यांनी केले

Protected Content