धरणगाव, प्रतिनिधी | येथील संभाजी ब्रिगेडच्या धरणगाव शहर शाखेने काल (दि.२५) अपक्ष उमेदवार महेंद्र सुभाष पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. पाठिंबा देतानाच संभाजी ब्रिगेड शाखेने त्यांना ५,००० रु. ची आर्थिक मदतही यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष त्र्यंबक पाटील, शहर उपाध्यक्ष तुषार पाटील, शहर सचिव मेघराज पाटील, शहर कार्याध्यक्ष राकेश पाटील तसेच बाबाजी पाटील, भूषण पाटील, सोनू पाटील, मनोज पाटील, अशोक पाटील, चेतन मराठे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.