जिल्हा रूग्णालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी; गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ

bike chori 201895 102842 05 09 2018

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी आठवडाभरानंतर अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी ऑनलाईन तक्रार करून सर्व कागदपत्रे तयार असतांना गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनिल विठ्ठल वाणी (वय-56) रा. वाणी गल्ली, शिरसोली ता.जि. जळगाव हे आपला मुलगा गौरव सुनिल वाणी आणि शालक नंदकिशोर दत्ताय वाणी यांच्यासोबत 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्याच्या परीसरात असलेल्या गणपती मंदीराजवळील नेत्र विभागासमोर दुचाकी क्रमांक एमएच 19 बीएक्स 8745 ही गाडी लावली त्यांच्या बाजूला शालकाची दुचाकी पार्क केली. दुपारी 12 वाजता नातेवाईकांना भेटल्यानंतर परत आले तेव्हा त्यांना दुचाकी मिळून आली नाही.

गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ
दुचाकी हरविल्याप्रकरणी ऑनलाईन तक्रार त्याच दिवशी केल्यानंतर सर्व कागदपत्र घेवून जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी ऑनलाईन तक्रारीचा अर्ज व सर्व कागदपत्रे देवूनही गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ करत होती. दरम्यान तक्रारदार हे पोलीस ठाण्याच्या आवारात उभे असतांना त्यांच्या ओळखीचे पोलीस कर्मचारी भेटले. पोलीस कर्मचारी ओळखीचा असल्याने त्याच्या मदतीने जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हा पेठ पोलीसांची काम करण्याची पध्दत अतिशय चुकीची असून त्यांच्या कामचुकारपणामुळे तक्रार करण्यासाठी आलेल्या तक्रारदारांकडून नाराजीचा सुर उमटत आहे.

Protected Content