अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाळधी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात राहणाऱ्या मुलाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी दिली. त्यानुसार बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील एका भागात तक्रारदार व पिडीत १७ वर्षीय मुलगी वास्तव्याला आहेत. २६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना गावात राहणाऱ्या एका मुलाने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, गावातील एका मुलानेच तिचे अपहरण केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या पालकांनी धरणगाव पोलीसा दिली. त्यानुसार बुधवार ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content