संभाजी ब्रिगेडची तालुका कार्यकारिणी जाहीर

बोदवड प्रतिनिधी | येथे पार पडलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडची बोदवड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

शहरातील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडची शहर व तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. तालुकाध्यक्ष अशोक निकम, शहराध्यक्ष विशाल तांगडे, संजय काकडे, निवृत्ती ढोले यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत बोदवड तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार, कार्याध्यक्ष हर्षल चौधरी, सचिव वैभव गावंडे, सहसचिव प्रशांत सुरडकर, तालुका संघटक संदीप पाटील, सहसंघटक गणेश लोणारे व बोदवड शहर कार्यकारिणीत नीलेश ठाकरे (उपाध्यक्ष), सागर पाटील (सचिव), गणेश लोहार (संघटक), सदस्यांमध्ये मनोज मुके, नाना बडगुजर यांचा समावेश आहे.

या बैठकीला तालुकाध्यक्ष अशोक निकम, शहराध्यक्ष विशाल तांगडे, निवृत्ती ढोले, संजय पाटील, प्रशांत सुरडकर, सागर पाटील, गणेश वानखेडे, हर्षल चौधरी, शैलेश वराडे, योगेश ढोले, विशाल खराटे, नीलेश ठाकरे, हेमंत चौधरी, शुभम पाटील, संदीप पाटील, मोहित राऊत आदींची उपस्थिती होती.

Protected Content