भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला असून याचे उदघाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.
साकेगाव येथे रविवारी सरपंच चषक स्पर्धा सुरू झाली. साकेगाव स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना आणि मॉर्निंग सीसी यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते हवेत बलून सोडून व चेंडू टोलवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवसांच्या सामन्यांमध्ये स्पोर्टन, त्रिमूर्ती, जय महाराष्ट्र या संघांनी विजय मिळवला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच योगिता सोनवणे, प्रमोद सावकारे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पं.स.चे माजी सभापती सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, बाजार समिती माजी सभापती संजय पाटील, उपसरपंच आनंद ठाकरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, ग्रामसेवक राकेश मुंडके, ग्रा.पं. सदस्य भूषणसिंग राजपूत, कुंदन कोळी, विलास ठोके, अजय चौधरी, अनिल सोनवाल, सुभाष कोळी, माजी सरपंच अनिल पाटील, विष्णू सोनवणे, डॉ. दीपक पाटील उपस्थित होते. समालोचक म्हणून रमजान पटेल, वासेफ पटेल, गुणलेखक म्हणून राजू भोईटे, पंच म्हणून प्रतीक कुलकर्णी यांनी काम पाहिले. राहुल चौधरी, पप्पू पटेल, प्रमोद चव्हाण, मॉंर्गिंग सीसीचे खेळाडू परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेतील पहिला सामना स्पार्टन व जय महाराष्ट्र या संघांमध्ये झाला. त्यात अखेरच्या ओव्हरमध्ये स्मार्टनने विजय संपादन केला. दुसरा सामना गेल्या वेळेचा सरपंच चषक विजेता जय महाराष्ट्र व जय बजरंग या संघात झाला. हा सामना जय महाराष्ट्र संघाने सात गड्यांनी जिंकला. तिसरा सामना त्रिमूर्ती विरुद्ध सत्कार संघात झाला. हा सामना त्रिमूर्ती संघाने ८५ धावांनी जिंकला.