रावेर प्रतिनिधी- शहरातील राजे शिवाजी चौकातील रहिवासी सागर महाजन याने नेटच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
येथील शहरातील राजे शिवाजी चौकातील मुलाने शिक्षणात घवघवीत यश मिळवीलेले आहे. सागर महाजन याने नेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.त्याने रावेर शहरातील सरदार जी जी हायस्कूल मधून इयत्ता १२ वीचे शिक्षण पूर्ण केले असुन व्ही.एस.नाईक कॉलेज मधून बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथून नेस वाडीया कॉलेज मधून एम.कॉम पूर्ण केले. यावर्षी ऑक्टोबर मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत ८८:३२ टक्के गुण मिळवुन त्याने नेटची परीक्षा उत्तीर्ण केली. सागर महाजन यांचे वडील दिलीप महाजन हे एक शेतकरी असुन नेट परीक्षा पास केल्याबद्दल किरण महाजन लखन महाजन, प्रदीप महाजन, पीयूष महाजन, आदींनी त्याचे अभिनंदन केले.