Home राजकीय सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण


मुंबई (वृत्तसंस्था) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. दोघांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात असून या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

 

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचला होती. दोघांमध्ये 10.45 ते 11.15 अशी अर्धा तास चर्चा सुरु होती. ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचे कळत आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना सचिनने घेतलेल्या या भेटीचा अनेक जण राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound