काँग्रेसला मलाई हवी, आम्हाला देशाची भलाई हवी : नरेंद्र मोदी


अरुणाचल प्रदेश (वृत्तप्रदेश) लोकसभा निवडणुकीसाठी एकामागोमाग एक प्रचारसभा घेतले असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशमधील आलो येथील एका जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे दिल्लीत सरकार असो किंवा एखाद्या राज्यात.. त्यांची भ्रष्टाचाराशी कायम आघाडी राहिली आहे. काँग्रेसला केवळ मलई कशी मिळेल याचीच चिंता असते आणि आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते, असा टोलाही मोदींनी लगावला.

 

आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेत असताना कायम स्वत:ला पैसा कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केलं आहे. कोणती योजना असेल तर पैसा कसा खाता येईल, संरक्षणविषयक करार असेल तर दलाली करून पैसे खाणं एवढेच त्यांना माहित होते. जेव्हा जेव्हा देशासाठी चांगली कामी झाली तेव्हा त्यांचे चेहरे पडले आहेत’, असे म्हणत मोदी सरकारवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधानांनी पटलवार केला. काँग्रेसची नेहमीच भ्रष्टाचाराबरोबर आघाडी राहिली आहे. हा सर्वांना बांधून ठेवणारा ‘फेव्हिकॉल करप्शन’आहे. त्यांचे नेते गरिबांची थाळी चोरतात. त्यांचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरतात. वृत्तपत्र चालवण्यासाठी दिलेल्या जमिनीतून लाखो रुपयांचे भाडे कमवतात. संरक्षण व्यवहारात दलाली घेतात. स्वत: जामिनावर आहेत. जे जामिनावर आहेत, ते चौकीदारला शिव्या देत आहेत.

Add Comment

Protected Content