पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढणारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकार संघ असुन या पत्रकार संघाच्या प्रत्येक तालुक्यात विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वात जुनी पत्रकार संघटना आहे. या पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सचिन सोमवंशी नेहमी लढत असतात यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा पत्रकार संघांच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या ३० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात सचिन सोमवंशी यांचे नाव घेतले जात आहे. पत्रकारीता करतांना कोणतेही तडजोड कधीही केली नाही. जे पत्रकार पाचोरा तालुका पत्रकार संघाचे सदस्य होतील त्यांचा सन्मान जपणे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे माझे कर्तव्य आहे असे सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.