यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील तरूण प्रगतीशील शेतकरी समाधान दिलीप चौधरी यांची केळी उत्पादक शेतकरी संघ,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
यावल तालुका दहिगाव येथील राहणारे तरूण प्रगतीशील समाधान दिलीप चौधरी यांनी अल्पवधीत शेती पिकांच्या उत्पादनाविषयी केलेले विविध यशस्वी प्रयोग लक्षात घेता त्यांनी केलेले तळमळीचे कार्य लक्षात घेता उत्पादक शेतकरी संघ , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
समाधान चौधरी यांना निवड पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ राहुल बच्छाव यांच्या स्वाक्षरीचे पत्र निवड पत्र देण्यात आले आहे . समाधान चौधरी यांच्या निवडीचे संस्थेचे मार्गदर्शक विजयसिंह गायकवाड , राज्य कार्यध्यक्ष सचिन गंगथडे, राज्य सचिव अतुल पाटील , समन्वयक सचिन कोरडे पाटील , तज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे,नामदेव वलेकर व हनुमंत चिकने आणी संजय रांगे यांच्यासह विजय प्रेमचंद पाटीत, वसंत गजमल पाटील,ललित पाटील, पवन पाटील,शेखर पाटील,दहिगाव परिसरातील शेतकरी बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.