जळगाव प्रतिनिधी । एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय व दिल्ली येथील ए.आय.सी. टी. ई. यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन “मशीन लर्निंग व पॅटर्न रेकग्नीशन” या विषयावर २१ डिसेंबर ते २६ डिसेंबर, २०२० दरम्यान ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर संशोधनाला अधिक गती देण्यासाठी ए.आय.सी.टी.ई. व आय.एस.टी.ई. तर्फे एकूण तीन कार्यशाळांना संमती दिली आहे त्या करिता निधी मंजूर केला आहे.
तिसऱ्या कार्यशाळेच्या उद्घाटनाचे वेळी डॉ.डी.एस.पाटील संचालक, भौतिक विज्ञान शाळेचे आणि विभागप्रमुख, इलेक्ट्रॉनिक्सहे ऑनलाईन पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, डॉ.एस. आर. सुरळकर, समन्वयक डॉ. पी. एच. झोपे व प्रा. एन.एम. काझी आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.डी.एस.पाटील यांनी मशीन लर्निंग व पॅटर्न रेकग्निशन हि काळाची गरज आहे.
या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजराथ, गोवा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश,आसाम, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळा, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगालअशा विविध राज्यातून १०० प्राध्यापक, संशोधन, स्नातक यांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यशाळेत मशीन लर्निंग व पॅटर्न रेकग्निशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भविष्यातील संशोधनाच्या संधी याबद्दल मार्गदर्शन मिळेल. कार्यशाळेसाठी प्रा. एन. एम. काझी, प्रा. अमोल वाणी,प्रा. अतुल करोडे, प्रा धनेश पाटील, प्रा निलेश महाजन प्रा. सतपाल राजपूत यांनी परिश्रम घेतले.
डॉ. जी. आर. सिन्हा ए. आय. आय. टी.,(म्यानमार), डॉ. यू. एस. भदादे, डॉ. शिवानंद गोरनाले, राणी चेन्नम्मा विद्यापीठ (बेळगाव), श्री. उमंग केजरीवाल, डायरेक्टर, ऍपट्रॉनिक्सटेक्नॉलॉजि, न्यू दिल्ली), डॉ. रमेश मांझा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, (औरंगाबाद), विपुलकुमार शाही, सिनियर ए. आय. कन्सल्टन्ट (दिल्ली), डॉ. प्रवीण मन्नावार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ,(औरंगाबाद), डॉ. विजय सेमवाल, एम. एन. आय. टी.(भोपाळ), डॉ. जितेंद्र टेम्भूर्णे (आय, आय.आय, टी., नागपूर) डॉ. रत्नदीप देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, (औरंगाबाद),प्रा. एमपीएस. चावला एस जी एस आय टी एस ( इंदूर), डॉ रवींद्र पुरवार इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली,डॉ चिराग एन मोदी एनआयटी गोवा, डॉ चंद्रजित पाल एआय संशोधक,रेडपाईन सिग्नल्स हैदराबाद, डॉ एम पी सिंह एनआयटी पटना, रोहन पाटील डेटा सायंटिस्ट, जीई हेल्थकेअर, जेएफडब्ल्यूटीसी बेंगलोर, सुष्मिता वशिष्ठ डेटा सायंटिस्ट,स्पाइस जेट आदींनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. एन. एम. काझी यांनी केले.