केकी मुस यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित व्हावे यासाठी प्रयत्नशील – खासदार पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्याचे नाव जगाच्या पाठीवर पोहचविणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व कलामहर्षी केकी मूस यांच्या  नावाने टपाल तिकीट प्रकाशित करण्यात यावे यासाठी प्रयत्नशील असून अशी मागणी केंद्रीय गृह मंत्री अमीत जी शाह यांचेकडे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केंद्राकडे विनंती केली आहे.

कलामहर्षी केकी मूस यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1912 रोजी मलबार येथे मुंबईमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक ,माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. असे असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात केलेली कलासाधना चाळीसगांव भूमीत केली. कला शाखेचे पदवीधर असलेले कलामहर्षी केकी मूस यांनी 1936 साली मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केली.उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंड येथील शेफील्ड येथे दाखल झाले. कमर्शिअल आर्ट डिप्लोमा करून त्यांनी बेनेट कॉलेजची फेलोशिप  मिळविली.जगातील ग्रीस, जपान ,रशिया, चीन असा विश्व प्रवास त्यांनी केला होता. 1940 साली त्यांनी आपल्या घरात कलानिर्मिती स्टुडिओची उभारण्यास सुरुवात केली.आज हा जगातील अत्युच्य पातळीचा स्टुडिओ ओळखला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात.

1940 ते 1957 पुढे आयुष्यभर त्यांनी कलेसाठी स्वतःला वाहून घेतले.त्यांच्या बाबतीत एक आश्चर्याची गोष्ट नेहमीच चर्चिली जाते. त्यांनी 1940 ते 31 डिसेंबर 1989 शेवटच्या श्वासापर्यंत यांनी सुमारे पन्नास वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतले अर्थात क्वारंटाईन करून घेतले होते. पेंटिंग, शिल्पकला, क्ले मॉडेलिंग, कार्विंग, स्केचिंग ,ओरेगामी, पेपर कटिंग कला,चित्रकला या बाबतीत त्यांचा हातखंडाने जगाला भुरळ घातली.यासोबतच त्यांनी सतार वाजवणे, गायन, वादन, नृत्य, नाट्य लेखन, वाचन, संगीतश्रवण, शेरोशायरी, फीलोसोफर या छंदांचा आपल्या जीवनात सतत आनंद घेतला. आपले “आय हॅव शेड माय टीचर्स” (मी अश्रू ढळले) आत्मचरित्र देखील त्यांनी लिहिले आहे. असोसिएट ऑफ रॉयल फोटोग्रफिक सोसायटी यु के, फेलो ऑफ रॉयल फोटोग्रफिक सोसायटी ग्रेटब्रिटन ,अमेरिकन फोटोग्रफिक सोसायटी ,फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च किताब “सर” हा बहुमान , इब्राहीम रहिमतुल्ला मेमोरियल शिल्ड,फेलो ऑफ कॅमेरा आर्ट फॅकल्टी ऑफ फोटोग्रफी अँड  सिनेमॅटोग्राफी,  भारतीय विज्ञान परिषद सन्मानपत्र, शेठ नारायण बंकट  लायब्ररी सन्मानपत्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तीनशेपेक्षा जास्त अवॉर्ड विजेता असलेले कलामहर्षी केकी मूस यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात यावे अशी  विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्राकडे केली आहे.

कला महर्षी के की मूस यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी  चाळीसगाव येथे माजी पंतप्रधान पंडित नेहरू,पद्मभूषण राम सुतार ,लोकनेते जयप्रकाश नारायण, महर्षी धोंडो केशव कर्वे, परमपूज्य सानेगुरुजी , लेखक प्र.के.अत्रे,पंडित महादेवशास्त्री जोशी , बाबा आमटे, बालगंधर्व हरी नारायण आपटे, ना सी फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, शिक्षणमंत्री विनोद तावडे , पानिपत कर विश्वासराव पाटील ,आचार्य दादा धर्माधिकारी, विवीध  जिल्हा व उच्च न्यायालय न्यायाधीश विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्य क्षेत्रातील मान्यवर  तसेच हजारो प्रशासकीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच कलामहर्षी केकी मूस आर्ट गॅलरी येथे भेट देवून यांच्या कलेचा आनंद घेतला आहे. अशा कलामहर्षी के की मुस यांचा आठवणींना व त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी भारत सरकारने त्यांच्यावर लवकरच टपाल तिकीट प्रकाशित करावे अशी  मागणी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी केली आहे.

Protected Content