Home Cities जळगाव एस. डी. फाऊंडेशनतर्फे भाविकांसाठी आरोग्य सुविधा व मेडीकल कॅम्प

एस. डी. फाऊंडेशनतर्फे भाविकांसाठी आरोग्य सुविधा व मेडीकल कॅम्प


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री श्री १००८ दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान, सांगवी, ता. पारोळा, जि.जळगांव ते दादाजी दरबार खंडवा पायी दिंडी यात्रेच्या पहिल्या जळगांव येथील मुक्काम निमित्ताने सर्व दिंडीकरु आणि भाविकांसाठी आरोग्य सुविधा (मेडीकल कॅम्प) एस.डी.फाऊंडेशन तर्फे आयोजित केला गेला. सेवाधर्म परिवाराचे प्रमुख आणी पत्रकार चंद्रशेखर नेवे यांच्या उपस्थितीत आरोग्य सेवेला सुरवात केली गेली. आरोग्य सेवेला जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे आणी नगरसेवक मयुर कापसे यांनी भेट दिली.

पद्मालय सर्जिकल चेअरमन सुभाष वाणी यांनी आरोग्य सेवे ला लागणारे सर्व सर्जिकल वस्तु मोफत देऊन एस.डी.फाऊंडेशनला मदत केली. डॉ. देवानंद धुमाळ, डॉ.सौ.स्वाती धुमाळ तसेच प्रशिक्षणार्थी डॉ.चेतन दुसाने, डॉ.नुपुर चौधरी, डॉ.महेक तलरेजा, डॉ.मानसी पाटील यांनी आरोग्य तपासणी आणी औषधोपचार केले. २७० हुन अधीक भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. एस.डी.फाऊंडेशन तर्फे सर्व डॉक्टर आणी प्रमुख पाहुण्यांचे तुळशी रोप देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव सुहास दुसाने यांनी सांगितले की अश्या प्रकारची सेवा आम्ही निरंतर करीत राहू. प्रसंगी अनेक मान्यवर, परिसरातील नागरिक, फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकेश जाधव व एस डी. फाऊंडेशन चे पदाधिकारी सुधाकर मगन दूसाने- अध्यक्ष, छोटू सीताराम पाटील – उपाध्यक्ष, तेजस मधुकर सोनवणे – सह सचिव, भाग्यश्री सुहास दुसाने – खजिनदार, सौ. जयश्री पंकज बऱ्हाटे – सदस्य, रोहिणी अजित विसपुते – सदस्य, प्रशांत विसपुते – प्रसिद्धी प्रमुख आदींनी खूप मेहनत घेवुन कार्यक्रम पार पडला असे सुहास सुधाकर दुसाने – सचिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Protected Content

Play sound