बेवारस वाहने दहा दिवसात घेऊन जाण्याचे ग्रामीण पोलीसांचे आवाहन

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । गेल्या काही वर्षांपासून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बेवारस वाहने हे पडून आहे. त्यामुळे सदर वाहन मालकांनी येत्या दहा दिवसांत मुळ दस्तऐवज दाखवून वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक यांनी केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून अपघात, चोरी व बेवारस वाहने ग्रामीण पोलिस ठाण्यात तशीच पडून आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत वाहन मालकांनी मुळ कागदपत्रे दाखवून आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे. जर वाहनधारकांनी दहा दिवसांत मालकी हक्क नसल्याचे मुळ दस्तऐवज सादर न केल्यास त्या सर्व वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथून मुल्यांकन करून रितसर लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यातून मिळालेली रक्कम हि शासनास भरणा करण्यात येणार आहे. सदर बेवारस वाहने ओळखता यावे म्हणून वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक व चेसिस नंबर येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहेत. नोटीस बोर्डावर आपापल्या वाहनांची खात्री करूनच मुळ दस्तऐवज सादर करावयाचे आहे. यासाठी दहा दिवसांच्या अवधीत मुळ दस्तऐवज सादर करावयाचे आहे.

Protected Content