यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी रूख्मा भालेराव यांची निवड

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी रुख्मा भालेराव (महाजन) यांची निवड करण्यात आली आहे. 

यावल नगर परिषदचे उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर सत्ताधारी गटाच्या नगरसेविका रुख्मा भालेराव (महाजन) यांची निवड यावलचे तहसीलदार व निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी बबन तडवी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ऑनलाईन निवडणुकीत रुख्माबाई भालेराव यांची निवड करण्यात आली. 

यावल नगर परिषदच्या सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या या उपनगराध्यक्ष निवडीच्या ऑनलाईन प्रक्रियेत एकुण १९नगरसेवकांनी आपला सहभाग नोंदविला दरम्यान रुख्माबाई भालेराव यांची ११ विरूद्ध ८ मतांनी निवड करण्यात आली. 

नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष व नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा. मुकेश येवले, माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते , नगरसेवक असलम नबी, नगरसेविका देवयानी महाजन, शिला सोनवणे, कल्पना वाणी, रेखा चौधरी या प्रामुख्याने सभागृहात उपस्थित राहुन यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष रुख्माबाई भालेराव यांच्या निवडीचे स्वागत केले. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!