Home क्राईम एस.पी. कार्यालयात राडा! पती-पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

एस.पी. कार्यालयात राडा! पती-पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात आज एका विचित्र घटनेने खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून समुपदेशनासाठी महिला दक्षता कक्षात आलेल्या पती-पत्नीच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या फ्री स्टाईल हाणामारीत महिलांचाही सहभाग होता.

विशेष म्हणजे, ज्या पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी हे नातेवाईक आले होते, त्यांचा वाद बाजूला राहिला आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलीस कर्मचाऱ्यांनी मात्र या भांडणाऱ्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच नातेवाईकांनी एकमेकांना मारहाण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound