बोदवड -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड हा स्वतंत्र तालुका असून या तालुक्याला सुमारे ५२ गावे जोडलेली आहे. मागील काळात बोदवड ता. बोदवड येथे परिवहन विभागाचे शिविर दर महिन्याला भरत होते. परंतु गत काही काळापासून सदरील परिवहन विभागाचे शिबीर घेतले जात नसल्याने बोदवड तालुक्यातील हजारो नागरिकांचे चार चाकी, दुचाकी, तीन चाकी चालक परवाना, वाहन परवांना व इतर तत्सम महत्वपूर्ण दाखल्यांसाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
त्यामूळे बोदवड ता. बोदवड येथे परिवहन विभागाचे शिबिर पूर्ववत सुरु करणे संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व लागलीच याच महिन्याची तारीख देवुन बोदवड येथे परिवहन विभागाचे शिबिर घेण्यात यावा अशी मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , जळगाव यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.