अरूणाचल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात १.८ कोटी रुपये आढळल्याच्या व्हिडीओमुळे खळबळ

download

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप काँग्रेसने भाजपावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी येथे पत्रकार परिषद घेवून भाजपावर आरोप केला आहे. पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओही यावेळी जारी केला आहे. सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. भाजपा हा पैसे मते विकत घेण्यासाठी वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

 

अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल का केला नाही? असाही पश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर तीन जणांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा समावेश आहे.
सुरजेवाला म्हणाले की, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा प्रकार तेव्हा झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या दिवशी अरूणाचल प्रदेशमध्ये रॅली होणार होती. निवडणुक आयोगाच्या आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेसै जप्त करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेस्ट हाउसमध्ये उपस्थित पाच गाड्यातून पैसे जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या पैशांच्या मदतीने मते विकत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content