Home Cities जामनेर पहूरला पोलीस दलाचे पथसंचलन

पहूरला पोलीस दलाचे पथसंचलन

0
68

पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पहूरमध्ये पोलीस दलाने पथसंचलन केले.

या पथसंचलकान पोलीस ठाण्यापासून संचलनास प्रारंभ झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि आरसीएफ प्लाटूनचे जवान पथसंचलनात सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन डॉ .एम.आर. लेले बसस्थानकावरून पुढे जात जळगांव मार्गावर पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. निवडणुकीच्या काळात सर्व जनेतेने आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्‍वर कातकडे यांनी केले. निवडणूकी दरम्यान गैरकृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारादेखील कातकडे यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound