रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्यावतीने लोक कलावंतांना जीवनावश्यक किटचे वाटप (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील ज्येष्ठ कलावंत विनोद ढगे यांनी समाजातील दानशुरांना साद घालून कलावंतांना मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्याहस्ते जयकीसनवाडीतील कांताईसभागृहात गरजू १०० कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

सद्यस्थितीत गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन व अन्य विविध कारणांनी लोककलांचे सादरीकरण बंद झाले आहे. त्यामुळे या प्रयोगशील कलांवर अवलंबून असणारे अनेक कलावंत व त्यांचे कुटुंबिय आर्थिक ओढगस्तीने ग्रासले आहेत. आजच्या या परिस्थितीत आर्थिक गर्तेत सापडलेल्या या कलावंतांना भरीव अशा आर्थिक मदतीची अपेक्षा असून, प्रशासकीय स्तरावर आपल्यापर्यंत याबाबतीत सर्वच प्रयोगशील कलांचे सादरीकरण करणाऱ्या या कलावंतांचा आवाज पोहचावा व आपल्या माध्यमातून सरकारी स्तरावर त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा. यासाठी आज शुक्रवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील कांताई सभागृहच्या आवारात सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्याहस्ते गरजू १०० कलावंतांना किराणा साहित्य कीटचे वाटप करण्यात आले आहे.

 

याप्रसंगी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, उपायुक्त संतोष वाहूळे, कलावंत विनोद कुमार ढगे, ब ऑफ जळगाव स्टारचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, निरज अग्रवाल, विपूल पटेल, दिलीप रंगलानी, सचिन बालधवा, हर्षल कटारीया, आदी उपस्थिती होती.

Protected Content