लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कच्या रोजगार मेळाव्यास प्रतिसाद

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गाडेगाव येथे लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यात १९० तरूणांना जागेवरच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून इतरांना लवकरच संधी मिळणार आहे.

लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्क व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव यांच्यातर्फे आज गाडेगाव ता. जामनेर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे सर्वांसाठी मोफत आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उमेदवारांना रोजगाराच्या संधीसोबतच करिअर मार्गदर्शन, स्वयंरोजगार व कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कतर्फे मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली. या मेळाव्यात १९० उमेदवारांची जागीच नोकरीसाठी निवड करण्यात आली असून अनेकांना कंपनी मुलाखतीसाठी लवकरच निमंत्रित करणार आहे.
मेळाव्यात युवकांना व्यवसाय मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, दीपस्तंभ फाऊंडेशनचे प्रा. यजुवेंद्र महाजन, सरपंच सुलभा भारंबे, रमाकांत भारंबे, प्रा. यजुर्वेंद्र महाजन,आशिष चौधरी, राजु राणे, प्रल्हाद भारंबे, जतीन ढाके, राजेश नेहते, हेमंत भंगाळे, निता वराडे, वैशाली पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन करतांना युवकांनी न्युनगंड काढावा, नोकरीसोबतच व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे असे सांगुन स्पर्धापरिक्षांच्या संदर्भात करावयाचा अभ्यास आदी विषयी मार्गदर्शन केले. तर गुगलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर आशिष चौधरी यांनी डिजीटल युगातील करिअरच्या संधी, मुलाखत तंत्र याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकांच्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी दिली. या रोजगार मेळाव्यात औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक येथ्ील कंपन्यांसह जॉब प्लेसमेंट कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. जळगाव जनता बँकेच्या स्टॉलहून युवकांना उद्योगासाठिच्या कर्जाची माहिती देण्यात आली. निता वराडे यांनी महिला व स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन केले. पंतप्रधान कौशल प्रशिक्षण योजनेची माहिती उमेदवारांना करुन देण्यात आली. विविध कंपन्यांनी जागीच मुलाखत घेवून उमेदवारांना नोकरी निश्‍चीत केली. तर काही कंपन्यांनी उमेदवारांचे अर्ज स्विकारुन त्यांना मुलाखतीसाठी लवकरच निमंत्रित करणार असल्याचे सांगितले. यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये नैतिक भंगाळे, दिपक वराडे, ज्ञानदेव वराडे, हर्षा भारंबे, गोपाळ नाले , विट्ठल वराडे यांना विविध बक्षिसे मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धीरज पाटील, सुत्रसंचालन राजेश भंगाळे, धर्मराज देवकर, प्रा.कल्पना भारंबे, सीमा भारंबे यांनी तर आभार रामानंद वारके यांनी मानले. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी वसंत कोलते, विश्‍वनाथ वारके, विकास नेहते, शरद भारंबे, हेमंत भंगाळे, बबलू बर्‍हाटे, बापू भारंबे, निलेश वाणी, गणेश येवले, गजानन किनगे, दिपक वराडे, प्रकाश वराडे,योगेश कोलते, अमोल पाटील, मणिकर्णीका महिला मंडळ जळगाव,समाजाचे गाडेगाव, नाशिक, भुसावळ, जळगाव, मुंबई, सुरत, पुणे, इंदौर, जामनेर, पंढरपूर, नेरी व चांदूरबिस्वाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content