पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नागपुरात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेंला सुरूवा झाली आहे. रोहित पवार यांनी गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना मतदारसंघातील विकास कामासाठी भेट घेतल्याची माहिती दिली. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
गेल्या आठवड्यात वर्धा येथे झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि गडकरी एका व्यासपीठावर होते. आता रोहित पवार यांनी गडकरी भेट घेतली आहे. या भेटीबाब रोहित पवार म्हणाले, मतदारसंघात दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासंदर्भात चर्चा केली. गडकरी विरोधी पक्षातील आमदार, नेत्यांना नेहमी ते मदत करीत असतात, असेही ते म्हणाले.