महाराष्ट्र एसडीजी अंमलबजावणीसाठी रोहित काळे १७ गावांना ठेवणार नजर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । एसडीजी ( शाश्वत विकासाचे ध्येय) संपुष्टात आणण्यासाठी भारताचे एसडीजी युथ ॲम्बेसेडर रोहित काळे यांनी महाराष्ट्र मधील १७ गावांची निवड केली असता त्यामध्ये खान्देशातील ७ गावांचा समावेश केला आहे.

त्या मध्ये धडगाव,कुऱ्हा ,वैजापूर, देवगड, घोडसगाव,मानेगाव, मेळहानी हे गाव आहेत. या गावांमध्ये दर्जेदार शिक्षण, रोजगार निर्मिती , स्वच्छता, सिंचन प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज, डिजिटल इंडिया, कृषी आधार योजना जागरूकता, आणि सर्व सरकारी योजनांची जागरूकता या सर्व क्षेत्रात उन्नति झाली पाहिजे या साठी हे काम करणार आहेत , कारण सध्याच्या परिस्थितीत पाहिली तर योजना भरपूर असतात पण ते फक्त कागदावर पण लोकांपर्यंत त्याची माहिती जात नाही त्या साठीच रोहित काळे यांनी हे उद्दिष्ट ठेऊन या गावांचा विकास झाला पाहिजे म्हणून हे 17 गावांना दत्तक / देखरेख आणि विकास करण्यासाठी घेतले.

निती आयोग, एसडीजी चौपाल , यूएनएसीसीसी, नागरिक फौंडेशन यांच्या संयुक्त पुढाकाराने प्रत्येक गावकरी व शहरी नागरिकांना एसडीजीची उद्दीष्टे आणि त्यांचे गौरव, त्यांची भूमिका व एसडीजीच्या प्रगतीविषयीची जबाबदारी आणि कृती आणि त्यांना एकत्रितपणे भाग घेण्यास व राष्ट्र उभारणीत हातभार लावणे ह्या करीत संपूर्ण देश भरात सामाजिक संस्था सोबत घेऊन गावा गावाचा विकास झाला पाहिजे त्या साठी काम करत आहे . या साठीच रोहित काळे सुध्दा पुढे आलेत.

 

Protected Content