रांची वृत्तसंस्था । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना रांची येथील जेएससीए मैदानावर खेळण्यात येत आहे. यात रोहित शर्माने २५५ चेंडूंत २१२ धावा केल्या. त्यात सहा षटकार आणि २८ चौकार आहेत. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. रांचीत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने द्विशतक पूर्ण केले. हे त्याचे पहिलेच द्विशतक आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यानं रांचीमध्ये कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं. त्यानं २५५ चेंडूंमध्ये २१२ धावा कुटल्या. यात सहा षटकार आणि २८ चौकारांचा समावेश आहे. तिसऱ्यांदा त्यानं दीडशतकी खेळी केली आहे. याआधी १७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्यानं ही खेळी केली होती. तत्पूर्वी, भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली होती. अवघ्या ३९ धावांवर संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले होते. मात्र, रोहित शर्मानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं ८६ चेंडूंतच अर्धशतक साजरं केलं. तर शतक पूर्ण करण्यासाठी त्यानं १३० चेंडूंचा सामना केला. त्यानं पहिल्या दिवशीच शतक पूर्ण केलं होतं. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळं काही वेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी रोहित शर्मा ११७ धावांवर, तर रहाणे ८३ धावांवर खेळत होता. या दोघांनीही दुसऱ्या दिवशीही डावाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीही त्यांनी मैदानावर वर्चस्व गाजवलं. रोहित शर्मानं द्विशतक साजरे केले तर अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली.