धुळे येथे मविआचे उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ रोहिणी खडसे यांची सभा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकी मतदानाचे चार टप्पे पार पडले असुन यात मोदीजींची लाट ओसरल्याचे दिसुन आले आहे. या चार टप्प्यात मतदारांनी भाजपा आणि महायुतीचे लाटेत विसर्जन केले असुन त्यासाठी महागाई बेरोजगारीने त्रस्त जनतेने स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याचे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी धुळे येथे आयोजित प्रचार सभेत केले.
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रचार सभा पार पडली यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या धुळे येथे महाविकास आघाडी तर्फे डॉ शोभा ताई बच्छाव या प्रशासनाची ओळख असणाऱ्या आणि प्रशासनावर उत्तम पकड असलेल्या उच्चशिक्षित उमेदवार आहेत जनतेचा त्यांना उस्फुर्त पाठिंबा लाभत असल्याचे दिसुन येत आहे. प्रचारासाठी राज्यभर दौरे करत असताना महाविकास आघाडीसाठी उत्कृष्ठ वातावरण असल्याचे दिसुन येत आहे.फक्त प्रचार केल्यावरच वातावरण निर्मिती होते असे नाही. आधी सर्व म्हणायचे लाट आहे लाट आहे परंतु आता लाट ओसरली असुन गेल्या चार टप्प्यात जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे तिथे भाजपा आणि महायुतीला लाट स्वतःबरोबर वाहत घेऊन गेली आहे मतदारांनी भाजपा महायुतीचे लाटेत विसर्जन केले आहे त्यासाठी महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेल्या जनतेने स्वतः स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून महायुतीच्या विरोधात मतदान केले आहे. आता जनता स्वतःहून म्हणतेय अबकी बार भाजपा तडीपार भाजपला तडीपार करून सोडणार मोदींना येऊ देणार नाही असे जनतेने ठरवले आहे
गेले दहा वर्षात आपण बघितले लोक स्वतःहून भाजपा चे झेंडे घेऊन फिरत होते लहानपणापासून मोठ्यापर्यंत लोक मोदी मोदी म्हणायचे पण आता मोदी नको रे बाबा म्हणताहेत कारण सर्वांनी गेल्या दहा वर्षात खुप त्रास सहन केला आपल्या भागातील शेतकरी बांधवाना खुप त्रास झाला शेतकऱ्यांना कांद्यासाठी खूपदा आंदोलन मोर्चे काढावे लागले कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन करावे लागले कमी भावामुळे कांद्याने डोळ्यात पाणी आणले. जेव्हा कांद्याच्या भावावर शेतकरी बोलतात तेव्हा त्यांना अटक केली गेली.
मोदींजींच्या सभेत एका शेतकरी बांधवाने मोदीजी कांद्यावर बोला अशी मागणी केली त्या शेतकरी बांधवाला पोलिसांनी फरफटत नेऊन त्याचा आवाज बंद केला. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही फक्त सत्ता हातात हवी आहे. शहरात सगळीकडे अबकी बार मोदी सरकार असे फलक लागले आहेत. आपल्या भारत देशाचे नाव घेतले कि सर्वांची मान अभिमानाने उंचावते पण आता भारत सरकार म्हणायचे सोडुन प्रत्येक ठिकाणी मोदी सरकार म्हटले जाते मोदी सरकार म्हणायला सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या घरचे पैसे आणले आहेत का? जनतेच्या घामाच्या पैशांवर हे सरकार चालते आहे जनतेच्या पैशांवर योजना राबवायच्या आणि भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हणायचे असे सुरू आहे भारत सरकार म्हणायला सत्ताधारी पक्षाच्या लोकांना लाज वाटते आहे. उद्या देशाचे नाव सुद्धा बदलवतील अशी शंका आहे. सत्ताधारी पक्षाचे खासदार संविधान बदलवण्याची भाषा करत आहेत.
आताच कोणी बोलायला गेले तर त्याचा आवाज दाबला जातो. हुकूमशाही कडे वाटचाल सुरू आहे चारशे पार झाले तर काय करतील सांगता येत नाही चारशे पार झाले तर लोकशाहीने सामान्य नागरिकांना दिलेले अधिकार बजावता येतील कि नाही शंका आहे? असे सर्व घडतेय आणि आपण फक्त बघत बसणार आहोत का? नक्कीच नाही माझा तुम्हा सर्व सुज्ञ नागरिकांवर विश्वास आहे मतदानातून हे चित्र बदलवण्याची हिच वेळ आहे. मतदानानंतर तुमची इच्छा असली तरी तुम्ही हे चित्र बदलवू शकणार नाही
मतदानाचा दिवस हा सर्वात ऐतिहासिक दिवस आहे म्हणून 20 तारिख ला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा आणि मतदान करा तुमच्या मुलांना रोजगार मिळण्यासाठी तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी, महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी ,वाढती महागाई कमी करण्यासाठी घराबाहेर पडून मतदान करा. मतदानाची कमी होत असलेली टक्केवारी हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे, फोडाफोडीच्या राजकारणाचा कंटाळा आला म्हणून मतदान न करता मतदानाच्या दिवशी सुट्टी घालवायला लोक बाहेर जातात पण लक्षात ठेवा मतदान हा तुम्हाला मिळालेला अधिकार आहे तुम्ही मतदानासाठी दिलेला दहा मिनिटांचा वेळ तुमचे उद्याचे भविष्य ठरवणार आहे. एका मताची ताकद खुप मोठी आहे म्हणून मी मतदान केले नाही तर एका मताने काय होते असे म्हणू नका तुमच्या एका मताने लोकशाही वाचणार आहे, पिकाला हक्काचा भाव मिळणार आहे, तरुणांना रोजगार मिळणार आहे, म्हणून जरूर मतदान करा. मणिपूर मध्ये माता भगिनींवर अत्याचार करण्यात आले तिथे दोन महिने कर्फ्यु लावण्यात आला देशाच्या पंतप्रधानांना तिथे जायला वेळ नाही त्यावर बोलायला ते तयार नाहीत परंतु चार पाच दिवसाआड महाराष्ट्रात येऊन सभा घ्यायला भाषण करायला वेळ आहे.
पंतप्रधान भाषणात बेरोजगारी वाढती महागाई किंवा गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या कामांवर बोलतील अशी सर्वांना अपेक्षा होती परंतु ते फक्त शरद पवार साहेब, उध्दव ठाकरे साहेब यांच्यावर पक्ष फोडाफोडी, कोणता पक्ष ओरिजनल आहे यावर बोलतात जनतेला हे नको आहे पक्ष फोडून तुम्ही काय केले ,पक्ष फोडाफोडीचे तुमचे पाप आहे हे जनतेला माहिती आहे एवढे करून सुदधा राज्यात महायुतीच्या जागा येणार नाहीत महाविकास आघाडीला अनुकुल वातावरण आहे राज्यात सर्वात जास्त महाविकास आघाडीच्या जागा येतील.म्हणून या निवडणुकीत विचारपुर्वक सर्वसामान्यांचे हित जोपासणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा आणि डॉ शोभाताई बच्छाव यांना बहुमताने विजयी करा असे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, उमेदवार शोभा बच्छाव आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content