ग्रामसेवक रमेश गजभे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात साजरा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील ग्रामसेवक रमेश हरी गजभे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम १६ मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी निशा प्रभाकर जाधव, मुक्ताईनगरातील सर्व ग्रामसेवक व कर्मचारी, सहकारी दलित मित्र वल्लभ चौधरी, वंदे मातरम् ग्रुप अध्यक्ष धनंजय सापधरे, किरण सावकारे, भागवत महाजन, नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होते.
रमेश हरी गजभे हे 29 सप्टेंबर 1996 रोजी रावेर तालुक्यातील सहस्र लिंग येथे ग्रामसेवक म्हणून रुजू झाले होते. 30 एप्रिल 2024 मुक्ताईनगर तालुक्यातील पंचाने, मेळसांगवे येथे सेवानिवृत्त झाले. नोकरीची 30 वर्षे सुखरुप सेवा त्यांनी पूर्ण केली. कार्यक्रमात सत्कार मुर्ती व मान्यवर यांनी आपआपले अनुभव व मते व्यक्त केली. त्यांचा मुलगा तेजस रमेश गजभे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Protected Content