Home Cities यावल धापा तुटल्याने वाहनधारकांना त्रास

धापा तुटल्याने वाहनधारकांना त्रास

0
66
raod yaval

raod yaval

यावल प्रतिनिधी । येथील शहराच्या विस्तारीत परिसरात धापा तुटल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

यावल शहरात नगर परिषदच्या माध्यमातुन विविध ठिकाणी लाखो रुपये खर्च करून गटारीवर इतर सार्वजनिक वापरच्या ठिकाणी वाहनधारक आणी पादचार्‍यांना त्रास होवु नये म्हणुन ठीकठीकाणी सिमेंटचे ढापे बांधले आहेत. या धाप्यांचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. यातच भुसावळ रोडवरील टेलीफोन एक्सचेंज समोरच्या रोडावर असलेल्या गटारींवर काही दिवसापुर्वीच बांधलेला धापा हा मध्य भागातुन तुटल्याने या मार्गावर नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर श्री स्वामी समर्थ मंदीर असल्याने दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची नेहमीच वर्दळ असते. याची दखल घेत नगरपालिकेने संबंधीत ठेकेदाराकडून या धाप्याचे काम करून घेण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound