धानोरा येथे शाळा व्यवस्थापन समितीतर्फे शाळा पाहणी

dhanora school

धानोरा प्रतिनिधी । येथे शाळा व्यवस्थापन समितीकडून नुकतीच शाळा पाहणी करून दुरुस्ती बाबत उपाय सुचवण्यात आले.

येत्या सोमवार पासुन शाळा सुरु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळा पूर्व तयारी नियोजन, नविन दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वाटप,अनुदानातुन शालेय साहीत्य खरेदी,गणवेश वाटप नियोजन, शाळेला संरक्षक भिंत बांधणे, शालेय पोषण आहार करारनामा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच शाळेत विविध उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांच्या कलांना वाव द्यावा, ज्ञानरचावादावर आधारीत शिक्षणावर भर द्यावा अशी मागणी प्रशांत सोनवणे यांनी केली. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र कोळी, प्रशांत सोनवणे, ज्ञानेश्‍वर सोनवणे,उषाबाई भोई, उमेदा तडवी, कैलास महाजन, चंद्रकांत चव्हाण, मुख्याध्यापक मुरलीधर बाविस्कर आदींनी शाळा पाहणी केली.

शाळेत शालेय पोषण आहारा ठिकाणी असणार्‍या पाण्याच्या नळांची अज्ञात टवाळखोरांनी नासधुस करुन नळ काढून टाकले आहे. तसेच तेथिल फरशी काढून फेकून दिल्याचे दिसून आले. यावर व्यवस्थापन समितीने पाहणी करुन उपाययोजना करण्यात याव्यात अशी आग्रही सुचना मांडली. तसेच शाळेच्या सार्वजनिक नळांवरुन येथिल टपरीचालक,दुकानदार नळ्या लावुन पाणी भरतात यावर अंकुश ठेवण्यासाठी देखिल प्रयत्न करण्यात येईल अशी चर्चादेखील करण्यात आली.

Protected Content