आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गायींना चारा वाटप

pachora shivsena programme

पाचोरा प्रतिनिधी । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने गायींना चारा वाटप करण्यात आला.

आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्ताने जाहिरातबाजीवर खर्च करण्यापेक्षा ते पैसे समाजोपयोगी किंवा जनकल्याण कामासाठी खर्च करावा असा आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मुक्या जनावरांना चारा मिळावा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन पाचोरा शिवसेना व युवासेनेने राम मंदिराजवळील गोशाळा मधील गायींना चारा वाटप व खाद्यान्न दान वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला. आशिर्वाद इन्फ्राचे अध्यक्ष मुकुंदअण्णा बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक सुरेश राजपुत, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजयकुमार जैस्वाल, नगरसेवक बापू हटकर भरत खंडेलवाल, पप्पु जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Protected Content