वीर सावरकर रिक्षा संघटनेतर्फे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

j1111

जळगाव प्रतिनिधी । आज दि.9 जुलै रोजी होणा-या रिक्षा बंदमध्ये येथील वीर सावरकर रिक्षा युनियन संघटना सहभागी नाहीय. परंतू ओला उबेरच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी, म्हणून रिक्षा-टॅक्सी व मालवाहतूक संघटनांनी परिवहन कार्यालयात एकत्र येत, परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, रिक्षा विमा हप्ता जोखमी एवढाच आकारावा, रिक्षा पासिंगमधील अडचणी दूर कराव्यात, रिक्षा खूला परवाना बंद करावा व वाहन संख्येला आळा घालून शहर वाचवा, अशा आशयाचे विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी रिक्षाचालकांचा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या प्रश्ना-विषयी चिंता आणि शासनाच्या धोरणाविषयी संताप व्यक्त करण्यात आला. हे रिक्षा चालकांच्या प्रश्नांचे भांडवल करुन आपली तुंबडी भरणा-या धंदेवाईक संघटना, एजंट, पुढा-यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. याच धंदेवाईक संघटनांनी एजंट रिक्षा परवाना खुला करण्याची मागणी केली होती. परवाना खुला झाल्यावर यातील पदाधिका-यांनी रिक्षा विक्रीची एजन्सी सुरु केली. आता रिक्षांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे रिक्षा सेवेचा बट्टयाबोळ झालाय. त्यामुळे यांनी अधिकचे परवाने थांबवावे, अशी कोल्हेकुई सुरु केली आहे. रिक्षा पंचायत पुणे जिल्हा वाहतुक सेवा संघटना या बंदमध्ये नाहीय. त्यामुळे डॉ.बाबा आढाव यांनी पाठिंबा दिल्याचा खोटा प्रचार सुरु आहे. रिक्षाचालक-टॅक्सीचालक यांनी यावर विश्वास ठेऊ नये,असे म्हटले आहे. या बैठकीत महाराष्ट्र पातळीवरील पुणे जिल्हा वाहतुक सेवा संघटना, आप रिक्षा संघटना, रिपब्लिकन वाहतक संघटना, क्रांती रिक्षा संघटना, रिक्षा-पंचायत पिंपरी चिंचवड, वीर सावरकर रिक्षा युनियन जळगांव संघटना, एकता रिक्षा-टॅक्सी युनियन संघटना, शालेय विद्यार्थी वाहतुक संघटना मालवाहतुक संघटना जळगांव या बंदमध्ये सहभागी नाहीत. अशी माहिती दिलीप सपकाळे, वीर सावरकर रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष, जळगांव रज्जाकभाई खान, टॅक्सी युनियन जिल्हाध्यक्ष, जळगांव, भरत वाघ, शालेय विद्यार्थी वाहतुक युनियन जिल्हाध्यक्ष, जळगांव. संजय पाटील, पोपट धोबळे, भानुदास गायकवाड, शशिकांत जाधव, किरण मराठे, विलास ठाकुर, सरताज भाई आदी तसेच अनेक रिक्षाचालकांनी निषेध व निदर्शन करुन आर.टी.ओ.अधिका-यांना निवेदन देण्यात आले.

 

Protected Content