Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे शिवसेना शाखाप्रमुख नेमणूक मोहिम

चाळीसगाव येथे शिवसेना शाखाप्रमुख नेमणूक मोहिम

0
56
mohim shivasena
mohim shivasena


mohim shivasena

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख नवीन शाखाप्रमुख नेमण्याची मोहीम ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या सप्ताह द्वारे घेण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक भाग म्हणून तालुक्यातही शिवसेने मार्फत तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत वार्ड निहाय महिला व पुरुष शाखाप्रमुख यांच्या नेमणुक करण्यात आल्या आहेत. या शाखा प्रमुखांच्या नावासह मोबाईल नंबर व फोटो असलेल्या सविस्तर याद्या शिवसेना येथील तालुका कार्यालयामार्फत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संपर्क प्रमुख प्रकाश वाणी यांच्यामार्फत शिवसेना भवन मुंबई येथे रवाना करण्यात येत आहे. या मोहिमेत शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण यांच्या मार्फत संपूर्ण तालुकाभर गट वाईज पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून त्यांच्यामार्फत ही मोहीम पूर्ण करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, जिल्हा उप समन्वयक महेंद्र पाटील, जिल्हा उप प्रमूख उमेश गुंजाळ, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, दिनेश विसपुते, मा.पं.स.सदस्य दिलीप पाटील, विलास भोई, संदीप पाटील, तुकाराम पाटील, रोहित जाधव, सचिन ठाकरे, पदम चव्हाण, बद्री चव्हाण, लिलाबाई राठोड, अनिल राठोड, नाना शिंदे व बळीराम चव्‍हाण आधी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले आहे.


Protected Content

Play sound