रिक्षा चालकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटसमोरून एका रिक्षा चालकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कैलास रमेश जाधव (वय-४३) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता ते त्यांची दुकाची (एमएच १९ बीएक्स ३६०७) ने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कामानिमित्त आले होत. त्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सायंकाळी ६.३० वाजता समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्री १०.३० जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

 

 

Protected Content