पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव येथील मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांसंदर्भात उद्या दि.३० डिसेंबर रोजी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा येथे राजीव गांधी टाऊन हॉलला सकाळी ११ वाजता बैठक तर भडगाव येथे दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात बैठक होणार आहे. राज्य शासनाने शेत रस्त्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रस्ताचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी दोन्ही तालुक्यात आढावा बैठक बोलावली आहे. या शिवाय या बैठकीत घरकुल व विविध योजनांचा ही आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.