यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आयसीडीएस एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, यावलच्या वतीने 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आदिवासी गावे व पाड्यांमध्ये आयोजित पोषण महा कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
यावल पंचायत समितीच्या सभागृहात एकात्मीक बालविकास प्रकल्प ( आयसीडीएस यावल ) च्या वतीने गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती अर्चना आटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान च्या काळात कार्यालयाच्या माध्यमातुन घेतल्या जाणाऱ्या पोषण महाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणे जनजागृती करीता आदीवासी वस्ती पाडयांवर रेलीचे काढणे, पालक मेळावे आहार प्रात्यक्षिक, सुदृढ बालक स्पर्धा, कुपोषण निर्मूलन या संदर्भात कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीला तालुक्यातील सर्व आंगणवाडी सेविका मोठया संख्येत उपस्थित होत्या या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे नियोजनाचे मार्गदर्शन करण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोले यांच्यासह पर्यवेक्षीका कल्पना तायडे, अलका कुरकुरे, पुनम ठाकरे, संजीवनी पाटील, दिपक कोल्हे, संदीप तायडे, संदीप साळवे, योगेश राजपुत आदी उपस्थित होते.