सावदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांची उद्या आढावा बैठक

सावदा प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उद्या (दि.१४) रोजी दुपारी ४ वाजता जेहरा मॅरेज हॉल येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांची महत्वाची बैठक उद्या आयोजीत करण्यात आली आहे. ही बैठक जेहरा मॅरेज हॉल येथे होणार असून याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत ना.अजितदादा पवार यांच्या आगामी संपर्क दौर्‍याबाबात विचार विनिमय करणे. शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश व सत्कार.पक्ष कार्यकरणीचा आढावा आणि शहरात शाखा उदघाटन बाबतचे कार्यक्रम ठरविणे यावर चर्चा होणार आहे. आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष कुशल जावळे यांनी केले आहे.

Protected Content