कोरोनाचे पुनरागमन : जिल्ह्यात ६ रुग्णांची नोंद

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात देखील जळगाव सह ग्रामीण भागात पुन्हा ६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच शहरी भागात चाचण्या वाढविण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी सार्वजनिक ठिकाणी संसर्ग चाचणी अनिवार्य नसल्याने आरोग्य विभागाची पंचाईत झाली असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात तसेच कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी जळगाव २ चोपडा तसेच अन्य दोन तालुक्यात असे एकूण ६ रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रतिबंधात्मक आणि खबरदारीचे उपाय म्हणून राज्य सरकारने चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले असले तरी रेल्वे, बस स्टेशन किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचण्या करण्याचे बंधनकारक नाही. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना लक्षणे असतील तरच चाचणी अनिवार्य आहे, आणि स्लम एरियात बहुतेक जण कोरोना चाचणी करून घेत नाहीत. आणि पॉझिटिव्ह आल्यास किमान सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल या भीतीने चाचणीस करण्यास नकार देत आहेत. सौम्य लक्षणे असली तर रुग्ण कोरोना चाचणी करत नसल्याचेही दिसून आले असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लसीकरणाकडे दुर्लक्ष
संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेसह जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करूनही संसर्ग लाट कमी झाल्याने बहुतांश नागरिकांचे  लसीकरण करून घेण्याकडे दुर्लक्ष झाले  आहे. जिल्ह्यात सुमारे ३६ लाखाहून अधिक लसीकरण पात्र नागरिक असून सरासरी ८५ टक्क्याहून अधिक नागरिकांनी पहिला तर ७५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सुमारे दीड लाख नागरिकांनी तर डोसच घेतले नसल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे १२ ते १७ वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थी किंवा युवकांचे मात्र लसीकरण आकडेवारी तुलनात्मक दृष्ट्या बहुतांश ठिकाणी पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असल्याची  समाधान कारक बाब असल्याचेहि जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

 

Protected Content