मुंबईत थर्टी फस्टच्या जल्लोषावर निर्बंध; अदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठीच्या आयोजित थर्टी फस्टच्या जल्लोषाला शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम, पार्टी रद्द करण्यात येणार असल्याचे मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. कोरोना निर्बंधांचे सर्वांना पालन करणे  आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. निर्बंधांचे उल्लंघन करून हॉटेल, रेस्टोरंट्स सुरू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. इमारतींच्या टेरेसवरील पार्टीबाबतही लोकांनी फेरविचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असले तरी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

 

Protected Content